अमळनेरमध्ये युवा बौद्धिक व श्रम संस्कार छावणीसाठी माजी सहभागी युवकांना सस्नेह निमंत्रण..

0
New-Doc-04-17-2026-06.35.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या युवा बौद्धिक व श्रम संस्कार छावणीच्या पार्श्वभूमीवर यंदाही माजी सहभागी युवक-युवतींना सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.

शनिवार, दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, गलवाडे रस्ता, अमळनेर येथे ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सन 2009 पासून या प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस युवा बौद्धिक व श्रम संस्कार छावणीचे आयोजन करण्यात येते. या छावणीची खास वैशिष्ट्य म्हणजे, यात सहभागी झालेले युवकच पुढील वर्षी छावणीचे संयोजन करतात. त्यामुळे युवकांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना विकसित होण्यास मोठी मदत होते.


यंदा दि. 26 ते 31 मे 2026 दरम्यान होणाऱ्या छावणीच्या नियोजनासाठी पूर्वी सहभागी झालेल्या युवक-युवतींना पुन्हा एकत्र आणण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आता अनुभवाने व जबाबदारीने अधिक सक्षम झालेल्या या तरुणांनी छावणीच्या आयोजनात आपला वेळ, श्रम, सल्ला, मार्गदर्शन व सहकार्य द्यावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
या बैठकीत छावणीचे नियोजन, जबाबदाऱ्या वाटप, उपक्रमांची आखणी आणि विविध सुधारणा यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे ज्या युवक-युवतींना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, छावणीत सहभागी झालेल्या आपल्या मित्रपरिवारालाही हे निमंत्रण पाठवावे, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे. काही कारणास्तव उपस्थित राहणे शक्य नसल्यास, छावणीच्या संयोजनाबाबत आपली मते व सूचना पाठवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी दर्शना पवार (मो. 9075570510) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 153500

22 Ct सोने 91.60% : ₹. 141200

18 Ct सोने 75.00% : ₹. 117000

शुद्ध चांदी 999%:₹. 2530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed