अमळनेरात आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना अन्नदान; व्ही. एस. ग्रुपचा सामाजिक उपक्रम..

0
New-Doc-04-16-2026-07.25.jpg


अमळनेर /आबिद शेख
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर फरशी रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विशाल सोनवणे व व्ही. एस. ग्रुपतर्फे भव्य अन्नदान कार्यक्रम पार पडला.

या उपक्रमाचा लाभ सुमारे २५०० हून अधिक नागरिकांनी घेतला.
व्ही. एस. ग्रुपकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा अन्नदान कार्यक्रम बौद्धवासी विजय युवराज सोनवणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला होता. जयंतीचे औचित्य साधून अत्यंत शिस्तबद्ध नियोजनातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उमेश सोनवणे, विकास कुमावत, शुभम शेटे, करण चौहान, शारुख शेख, कृष्णा बिऱ्हाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.
या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा आदर्श दिसून आला. शहरातील विविध स्तरांतील नागरिकांनी उपस्थित राहून अन्नदानाचा लाभ घेतला तसेच या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed