जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त जळगाव पोलिसांची ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धा; पत्रकारांना सहभागाचे आवाहन.

0

24 प्राईम न्यूज 28 Jul 2026


जळगाव, प्रतिनिधी : जागतिक छायाचित्रण दिन (१९ ऑगस्ट) निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पत्रकारांसाठी “विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार–जनता भागीदारी छायाचित्र स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. पोलीस, पत्रकार आणि नागरिक यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


छायाचित्र हे केवळ एक चित्र नसून समाजातील वास्तव, भावना, संघर्ष, सेवा, कर्तव्य आणि प्रेरणा यांचे प्रभावी दस्तऐवजीकरण असते. पत्रकार आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घटनांचे क्षण टिपून त्यांना इतिहासात जतन करतात. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्याबरोबरच समाजात सकारात्मक संदेश देणाऱ्या छायाचित्रांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.
स्पर्धेसाठी पुढील सात गट निश्चित करण्यात आले आहेत –
पोलिस इन पब्लिक सर्व्हिस
क्राईम फोटो
सोशल फोटो
ट्रॅफिक फोटो
जळगाव हेरिटेज फोटो
स्पोर्ट्स फोटो
वुमन एम्पॉवरमेंट फोटो
स्पर्धेसाठी छायाचित्रे पाठविण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०२६ असून इच्छुक पत्रकारांनी आपली छायाचित्रे व्हॉट्सअॅप क्रमांक ९७०२२००३१५ वर पाठवावीत. प्राप्त छायाचित्रांचे मोठ्या आकारात प्रिंट करून प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
छायाचित्र प्रदर्शन १५ ऑगस्ट रोजी पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सातही गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय असे प्रत्येकी तीन पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार वितरण मान्यवर मंत्री यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. आपल्या छायाचित्रांमधून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग, सेवाभाव आणि पोलीस–जनता सहकार्याचे प्रभावी दर्शन घडवून या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed