कोट्यवधींच्या खर्चानंतरही मारवड प्राथमिक आरोग्य केंद्र ठप्प; डॉक्टर-अधिकारी नसल्याने ग्रामस्थ संतप्त..
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर तालुक्यातील मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून अत्याधुनिक इमारत उभारण्यात आली असली, तरीही प्रत्यक्षात येथे आरोग्य सेवा ठप्प असल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक उपचारांसाठीही एकही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर प्रकारामुळे खेडी येथील पोलीस पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “इमारत उभी केली, पण डॉक्टरच नाहीत, मग नागरिकांनी उपचार कुठे घ्यायचे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

आरोग्य केंद्र सुरू असतानाही आवश्यक मनुष्यबळ नसल्यामुळे रुग्णांना इतर ठिकाणी जावे लागत असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे हाल होत आहेत. शासनाने तातडीने लक्ष देऊन येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, संबंधित आरोग्य विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152000
22 Ct सोने 91.60% : ₹. 139800
18 Ct सोने 75.00% : ₹. 115500
शुद्ध चांदी 999%:₹. 2470/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
