अमळनेरमध्ये ‘रॉयल फर्निचर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स’ व ‘भाटिया मोबाईल’चे भव्य उद्घाटन; ग्राहकांना एकाच छताखाली सर्व सुविधा..
आबिद शेख / अमळनेर

अमळनेर : शहरातील ग्राहकांसाठी अत्याधुनिक फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘रॉयल फर्निचर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स’ तसेच ‘भाटिया मोबाईल’ या दोन्ही दुकानांचा भव्य उद्घाटन व शुभारंभ समारंभ उत्साहात संपन्न झाला.

या शोरूमचे उद्घाटन हज्ज्न सुगराबी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेला हा सोहळा सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत रंगला. उद्घाटन प्रसंगी शहरातील अनेक मान्यवर, आजी-माजी नगरसेवक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.

नव्या शोरूममध्ये ग्राहकांसाठी विविध नामांकित कंपन्यांची मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. Samsung, Oppo, Vivo, Realme, Apple यांसारख्या अग्रगण्य ब्रँड्सचे मोबाईल येथे विक्रीसाठी उपलब्ध असून, आधुनिक तंत्रज्ञानासह उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमामुळे अमळनेर शहरातील ग्राहकांना दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा स्थानिक स्तरावरच मिळणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात या नव्या शोरूममुळे एक वेगळी ओळख निर्माण होणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152000
22 Ct सोने 91.60% : ₹. 139800
18 Ct सोने 75.00% : ₹. 115500
शुद्ध चांदी 999%:₹. 2470/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
