‘विचार आणि शौर्याचा संगम’ : अमळनेरमध्ये आंबेडकर जयंती व अग्निशमन दिन उत्साहात..

0
New-Doc-04-15-2026-06.58.jpg

आबिद शेख/अमळनेर अमळनेर :- नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीष दादा चौधरी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक नाविद शेख, मोहन सातपुते, गुलाब पाटील, भरतसिंग परदेशी, योगराज सदाशिव, दीपक चौगुले, तुळशीराम हटकर, सोमचंद संदनशिव, सुधीर चौधरी, अनिल बेंडवाल, राहुल कंजर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.


कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांच्या विचारांचे आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे स्मरण करण्यात आले.
१४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘अग्निशमन सेवा दिना’निमित्त अग्निशमन दलातील जवानांच्या शौर्य, तत्परता आणि निःस्वार्थ सेवाभावाचा विशेष गौरव करण्यात आला. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अग्निशमन दल हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असते. कोणत्याही आपत्तीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे जवान जनसेवेसाठी धावून जातात. त्यांच्या कार्याचा सन्मान समाजाने कायम राखला पाहिजे.”

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139800

18 Ct सोने 75.00% : ₹. 115500

शुद्ध चांदी 999%:₹. 2470/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed