अमळनेर नगरपरिषदेचा निष्काळजीपणा; ८० हजार लिटर पाणी वाया, नागरिक संतप्त..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील पैलाड भागातील साईबाबा नगर येथे नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे तब्बल ८० हजार लिटर पाणी वाया गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याच्या टाकीचा मुख्य व्हॉल्व्ह अचानक खराब झाल्याने प्रशासनाला संपूर्ण टाकी रिकामी करावी लागली.

स्थानिकांच्या मते, नियमित देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. पाणीटंचाईच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यासाठी तो काढावा लागल्याने टाकीतील सुमारे ८० हजार लिटर पाणी नाईलाजास्तव जमिनीवर सोडण्यात आले. यामुळे परिसरात चिखल साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागला. प्रशासनाने तात्पुरता बायपास करून पाणीपुरवठा सुरू केला असला, तरी नागरिकांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत नगरपरिषदेचे अभियंता सत्येम पाटील यांनी सांगितले की, “तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणी सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. लवकरच व्हॉल्व्ह दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.”
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152000
22 Ct सोने 91.60% : ₹. 139800
18 Ct सोने 75.00% : ₹. 115500
शुद्ध चांदी 999%:₹. 2470/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
