जळगावच्या जावेद अहमद यांचे शौर्य गौरवले; महाराष्ट्र शासनाकडून ६० लाखांची मदत प्रदान..

0
New-Doc-04-14-2026-06.40.jpg


24 प्राईम न्यूज 14 एप्रिल 2026
जळगावचे सुपुत्र आणि CRPF जवान जावेद अहमद यांच्या अतुलनीय शौर्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजना’ अंतर्गत ६० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली असून, या मदतीचे वितरण नुकतेच करण्यात आले आहे.


१८ एप्रिल २०२० रोजी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला (सोपोर) येथे दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर भीषण हल्ला केला होता. या गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतरही जावेद अहमद यांनी अदम्य धैर्य दाखवत आपले वाहन सुरक्षित स्थळी नेले आणि सहकाऱ्यांचे प्राण वाचवले. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन त्यांना ७४ टक्के कायमस्वरूपी अपंगत्व आले.
अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हार न मानता देशसेवा सुरूच ठेवली आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.


दरम्यान, १० एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जावेद अहमद यांना ६० लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते.
जावेद अहमद यांच्या शौर्य आणि देशभक्तीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed