अमळनेरच्या भीम कन्येची MPSC मध्ये झळाळती कामगिरी; महसूल सहाय्यक पदावर निवड..
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर शहरासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून येथील कू. आकांक्षा जितेंद्र मोरे या भीम कन्येने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महसूल सहाय्यक (Revenue Assistant) पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


सामान्य कुटुंबातून येत अत्यंत मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर आकांक्षा मोरे यांनी हे यश मिळवले आहे. स्पर्धा परीक्षेच्या कठीण प्रवासात त्यांनी सातत्याने अभ्यास करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली. त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचे पाठबळ, मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती हे महत्त्वाचे घटक ठरले.
त्यांच्या निवडीमुळे अमळनेर शहरासह बौद्ध समाजामध्ये विशेष आनंद व्यक्त केला जात आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाने इतर तरुण-तरुणींनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
समस्त अमळनेर येथील बौद्ध समाजाच्या वतीने कू. आकांक्षा मोरे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

