होमी भाभा राज्यस्तरीय स्पर्धेत अर्जुन जोशीला सुवर्णपदक..
अमळनेर /आबिद शेख
येथील सेंट मेरी स्कूलचा इयत्ता सहावीतील विद्यार्थी तथा अर्जुन सायन्स अकॅडमीचा गुणवंत विद्यार्थी चि. अर्जुन ज्ञानेश जोशी याने डॉ. होमी भाभा राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धा 2025–26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

मुंबई येथे दिनांक 12 एप्रिल रोजी पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात अर्जुन जोशी याने नाशिक विभागातून प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले. मान्यवरांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला.

विज्ञान विषयातील सखोल समज, नियमित सराव आणि मार्गदर्शक शिक्षिका तसेच त्याची आई सौ. सोनल जोशी यांच्या मार्गदर्शनामुळे अर्जुनने हे यश मिळवले. त्याने अर्जुन सायन्स अकॅडमीच्या फाउंडेशन बॅचेसचा लाभ घेतला असून तेथे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत विज्ञान विषयाचे मार्गदर्शन तसेच NET, SET व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करून दिली जाते.

अर्जुनला सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. तो सेवानिवृत्त प्राध्यापक पी. जे. जोशी व प्रा. डी. एस. लोहार यांचा नातू असून ज्ञानेश व सौ. सोनल जोशी यांचा सुपुत्र आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल अमळनेर व परिसरातील पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून अर्जुन जोशीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
