भोंदू अशोक खरात अडचणीत; मृत्यूबाबतच केली धक्कादायक भविष्यवाणी..

0
New-Doc-04-12-2026-06.31.jpg


नाशिक | प्रतिनिधी
दैवी शक्ती असल्याचा दावा करत लोकांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदू अशोक खरात याने आता स्वतःच्याच आयुष्याबाबत धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. पोलीस चौकशीदरम्यान त्याने हतबल प्रतिक्रिया देत, “मी इथून बाहेर पडेन असे वाटत नाही, माझा मृत्यू जेलमध्येच होईल,” असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.


धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात तब्बल १५ गुन्हे दाखल झाले असून, विशेष तपास पथक (SIT) त्याच्याविरोधातील गंभीर प्रकरणांचा तपास करत आहे.


सध्या सुरू असलेल्या चौकशीत खरातने फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस चौकशीचा दबाव वाढल्यानंतर त्याने सुटका होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे मान्य केले आहे.


तपासात उघड झाले आहे की, अध्यात्मिक शक्ती मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यातून लैंगिक शोषणासोबतच कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहारही केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नाशिकसह शिर्डी आणि नगर जिल्ह्यातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही खरातच्या जीविताला धोका असल्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात पुन्हा एकदा जनजागृतीची गरज अधोरेखित होत आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139000

18 Ct सोने 75.00% : ₹. 115000

शुद्ध चांदी 999%:₹. 2440/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed