अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीस गेलेला डंपर ९ दिवसांत शोधून काढला; ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे सत्कार..
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने दाखविलेल्या तत्परता आणि कुशल तपासामुळे चोरीस गेलेला डंपर अवघ्या नऊ दिवसांत शोधून काढण्यात यश मिळाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ट्रान्सपोर्ट व ट्रक असोसिएशनतर्फे संबंधित अधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील निलेश संजय पाटील यांचा नवीन डंपर गांधली पेट्रोल पंप परिसरातून चोरीस गेला होता. या घटनेमुळे डंपर व ट्रक चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अमळनेर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने तपास सुरू केला.

डीवायएसपी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार तसेच विनोदभाऊ, निलेश मोरे, सिद्धांत शिसोदे आणि प्रशांत पाटील यांच्या पथकाने सलग नऊ दिवस विविध ठिकाणी तपास मोहीम राबवली. तपासादरम्यान त्यांनी मध्यप्रदेशातील इंदूर येथील एका गोदामावर छापा टाकून चोरीस गेलेला डंपर शोधून काढला.

यह दोनों शॉप का ‘उद्घाटन एवं शुभारंभ समारोह’
मंगलवार, दिनांक १४/४/२०२६ को सुबह १०.३० बजे से शाम ७.०० बजे तक
या कारवाईत आरोपींनी डंपरचे सुटे भाग करून ठेवलेले आढळून आले. पोलिसांनी सर्व सुटे भाग जप्त करून ते अमळनेर येथे आणले. या यशस्वी कारवाईमुळे पुढील ट्रक चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली असून वाहनधारकांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ट्रान्सपोर्ट व ट्रक असोसिएशनतर्फे डीवायएसपी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या या धाडसी व प्रभावी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 151000
22 Ct सोने 91.60% : ₹. 139000
18 Ct सोने 75.00% : ₹. 115000
शुद्ध चांदी 999%:₹. 2440/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
