अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कडून थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांन जयंती निमित्त अभिवादन..

0
New-Doc-04-11-2026-21.25.jpg


अमळनेर : आबिद शेख
येथील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.


शेतकरी, वंचित घटक आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे तसेच भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे महान समाजसुधारक म्हणून महात्मा फुले यांचे कार्य स्मरणात ठेवत त्यांच्या कार्यप्रेरणा स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.


या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ तसेच संत सावता माळी सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.


यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा संघटक भिमराव महाजन, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, प्रा. अशोक पवार, संविधान जागरच्या प्रमुख श्रद्धा रेखा राजेंद्र, ठाकरे सर, सचिव गणेश महाजन, माजी उपनगराध्यक्ष रामदास शेलकर, पांडुरंग महाजन, बी.आर. महाजन, महेंद्र महाजन, भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन, ॲड. रमाकांत महाजन, ॲड. कुंदन साळुंखे, कैलास गजानन महाजन, अशोक पोपट महाजन, शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष चित्रकला महाजन, प्रा. प्रकाश महाजन, गणेश उखा महाजन, राजेंद्र भास्कर महाजन, प्रगती क्लासेसचे संचालक संदीप महाजन, हेमंत बाबूलाल महाजन, जितेंद्र महाजन यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्य आणि समता सैनिक ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी एकजूट होण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139000

18 Ct सोने 75.00% : ₹. 115000

शुद्ध चांदी 999%:₹. 2440/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed