अमळनेर तालुका होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. दिपाली साळुंखे यांची निवड…

0
New-Doc-04-11-2026-12.54.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर तालुका होमिओपॅथिक डॉक्टर संघटना (HIMPAN) च्या तालुका अध्यक्षपदी डॉ. दिपाली कुंदन साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
दि. १० एप्रिल २०२६ रोजी होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त मंगळ ग्रह देव संस्थान, अमळनेर येथे दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान डॉ. दिपाली साळुंखे यांनी तालुका अध्यक्षपदाची सूत्रे अधिकृतपणे स्वीकारली.


कार्यक्रमास संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी तसेच तालुक्यातील अनेक होमिओपॅथी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


डॉ. दिपाली साळुंखे यांच्या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून नातेवाईक व मित्रमंडळींकडूनही त्यांचे कौतुक केले जात आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर तालुक्यात होमिओपॅथी क्षेत्राचा अधिक विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed