अमळनेर नगरपरिषदेच्या पॅनल अॅडव्होकेट पदी अॅड. कुंदन साळुंखे यांची नियुक्ती..
अमळनेर /आबिद शेख
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागार (पॅनल अॅडव्होकेट) म्हणून अभ्यासू व अनुभवी विधीज्ञ अॅड. कुंदन साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान केले.

अॅड. साळुंखे हे सध्या अमळनेर तसेच जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करत असून, कायदेविषयक सखोल ज्ञान व प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वीही त्यांनी अर्बन बँकेचे कायदेशीर सल्लागार म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
या नियुक्तीनंतर अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या विविध प्रकरणांमध्ये, तसेच जिल्हा सत्र न्यायालय व वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालयात ते परिषदेची बाजू प्रभावीपणे मांडणार आहेत.
राजकीय, सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

अॅड. कुंदन साळुंखे यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यामध्ये माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, अध्यक्ष नानासाहेब गंभीर सर (माळी समाज – महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात), मनोहर महाजन सर (अध्यक्ष, अमळनेर माळी समाज), माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, तसेच संपादक भीमराव महाजन (माळी भूषण) यांचा समावेश आहे.
याशिवाय पप्पू महाजन, बापूसाहेब रणजीत पाटील, हेमंत दादा भांडारकर, अॅड. आर. जी. चव्हाण, बापू चिमण महाजन, डॉ. योगेश रघुनाथ महाजन, बाबूलाल महाजन सर, गंगाराम निंबा महाजन, नरेश साळी, शंकर सोमा महाजन, गोविंदा दगा महाजन, आर. एन. पवार सर, राहल महाजन, अनिल मधुकर महाजन, राजेंद्र भास्कर महाजन यांच्यासह नातेवाईक, मित्रपरिवार, अमळनेर वकील संघ, कोर्ट कर्मचारी संघटना, नगरपरिषदेचे कर्मचारी, लासुर गावातील ग्रामस्थ व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
जबाबदारीतून अपेक्षा वाढल्या
अॅड. साळुंखे यांच्या नियुक्तीमुळे नगरपरिषदेच्या कायदेशीर कामकाजाला अधिक बळकटी मिळेल, तसेच प्रलंबित प्रकरणांमध्ये योग्य व वेळेत मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
