भूमी अभिलेख दिनानिमित्त उपअधीक्षक स्मिता गावित यांचा ग्राहक पंचायततर्फे सत्कार..

0
New-Doc-04-11-2026-10.08.jpg

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी भूमी अभिलेख दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर यांच्या वतीने सिटी सर्वे कार्यालयातील भूमी अभिलेख उपअधीक्षक सौ. स्मिता गावित यांना पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.


यावेळी सुहास अहिरे यांनी भूमी अभिलेख विभागाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, भारतात भूमी अभिलेखनाची परंपरा ब्रिटिश काळापासून सुरू असून जमीन मोजणी व नोंदणी अत्यंत अचूकतेने केली जात होती. कर वसुलीसाठी सुरू झालेली ही प्रक्रिया आजही तितक्याच विश्वासार्हतेने चालू आहे. पूर्वी साखळदंडाच्या साहाय्याने मोजमाप केले जात असे, जे अत्यंत कष्टप्रद होते. या कामात अनेक कर्मचाऱ्यांनी आपले प्राणही गमावले, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच, भूमी अभिलेखनामुळे जमीन मालकी हक्क स्पष्ट होऊन वाद-विवाद टाळण्यास मदत होते. सध्या या विभागाचे मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन झाले असून महाराष्ट्र शासनाच्या ‘महाभूमिलेख’ पोर्टलद्वारे सातबारा उतारे व इतर कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचून पारदर्शकता वाढल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला महिला आयाम प्रमुख ॲड. सौ. भारती, तालुका उपाध्यक्ष सौ. ज्योती भावसार, जिल्हा उपाध्यक्ष सतीश देशमुख, जिल्हा सहसचिव मकसूद बोहरी, ग्राहक संरक्षण समिती सदस्य नरेंद्र बाळू पाटील, जिल्हा बँकिंग व सायबर प्रमुख विजय शुक्ला तसेच जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख सुनील वाघ यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139000

18 Ct सोने 75.00% : ₹. 115000

शुद्ध चांदी 999%:₹. 2440/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed