दामिनी पथकाची धडक कारवाई; दोन प्रेमी युगुलांवर कारवाई, मुली पालकांच्या ताब्यात..

0
New-Doc-04-11-2026-09.34.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील गलवाडे रस्त्यावरील सानेगुरुजी स्मारक परिसरात निर्जन ठिकाणी फिरणाऱ्या दोन प्रेमी युगुलांवर दामिनी पथकाने कारवाई केली. या प्रकरणात संबंधित मुलींना समज देऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शहराबाहेरील शांत व निर्जन ठिकाणी प्रेमी युगुलांची वर्दळ वाढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासाठी विशेष दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. १० रोजी दुपारी एका जागरूक नागरिकाने पोलिसांना फोन करून सानेगुरुजी स्मारक परिसरात प्रेमी युगुल गेल्याची माहिती दिली.


पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे, पोलीस कॉन्स्टेबल श्यामल पारधी, मोनिका पाटील आणि सुनील पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही प्रेमी युगुलांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले.
दोन्ही मुली अमळनेर शहरातील असून त्या वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून समज देत मुलींना त्यांच्या ताब्यात दिले. तसेच संबंधित दोन तरुणांवर कलम ११२ व ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, अनेक तरुण-तरुणी शिकवणी किंवा क्लासच्या नावाखाली घरातून बाहेर पडून निर्जन ठिकाणी भेट देत असल्याचे आढळून येत आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139000

18 Ct सोने 75.00% : ₹. 115000

शुद्ध चांदी 999%:₹. 2440/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed