अमळनेरात पत्रकार संघातर्फे मोफत भव्य कॅम्प; नागरिकांनी लाभ घ्यावा..

0
New-Doc-04-10-2026-22.51.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई (शाखा अमळनेर) यांच्या वतीने भव्य कायरोप्रॅक्टिक ट्रीटमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

या कॅम्पमध्ये शरीरातील नसांचे विकार व हाडांच्या समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार केले जाणार आहेत. प्रत्येक रुग्णाला ७ दिवसांची थेरपी देण्यात येणार असून, हातांच्या मदतीने विशेष पद्धतीने उपचार केले जाणार आहेत.

या कॅम्पमध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, सायटिका, अॅसिडिटी तसेच पोट साफ न होणे अशा विविध आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

कॅम्पची सुरुवात ११ एप्रिल २०२६ पासून होणार असून, सकाळी १० ते १ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत रुग्णांची तपासणी केली जाईल. राजस्थान येथील डॉ. दर्शन चौधरी हे तज्ज्ञ डॉक्टर या कॅम्पमध्ये सेवा देणार आहेत.

फक्त ७ दिवसांसाठीच हा कॅम्प आयोजित करण्यात आला असून, प्रती रुग्ण ३०० रुपये इतकी नाममात्र फी ठेवण्यात आली आहे.

हा कॅम्प तहसील कार्यालयाजवळील सुरक्षा भवन, जिजाऊ गेट परिसर, संजय टी स्टॉल शेजारी, अमळनेर (जि. जळगाव) येथे होणार आहे.

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी नागरिकांनी 7796112894, 9579764004, 9145442324 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139000

18 Ct सोने 75.00% : ₹. 115000

शुद्ध चांदी 999%:₹. 2440/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed