‘आई-वडिलांना विसरू नका, त्यांच्या त्यागाशिवाय जीवनाला अर्थ नाही’ – वसंत हंकारे.

0
New-Doc-04-10-2026-06.38.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : तुमच्या जन्मापासून ते तुम्हाला घडविण्यापर्यंत आईच्या रक्ताचे आणि वडिलांच्या घामाचे मोठे योगदान असते. त्यामुळे त्या आई-वडिलांना कधीही विसरू नका; त्यांच्या शिवाय तुमच्या जीवनाला शून्य अर्थ आहे, असे प्रभावी प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते व समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांनी केले.


अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे शिवशाही समिती व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती चौकात “न समजलेला बाप समजून घेताना” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून झाली. यावेळी कु. पूर्वशी पाटील हिच्या हस्ते आरती करण्यात आली.


वसंत हंकारे यांनी आपल्या खास शैलीत समाजातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. पळून जाणाऱ्या मुली, आई-वडिलांना सोडून देणारी मुले यांसारख्या संवेदनशील विषयांना हात घालत त्यांनी सुरुवातीला विनोदी शैलीत प्रेक्षकांना हसवले. त्यानंतर गंभीर होत आई-वडिलांचे त्याग, कष्टमय जीवन आणि मुलांप्रती असलेले निस्वार्थ प्रेम यावर प्रकाश टाकला.
त्यांच्या धीरगंभीर आवाजातील भावनिक आवाहनाला उपस्थितांनी साश्रुनयनांनी प्रतिसाद दिला. आई-वडील आणि मुलांमधील नाते अधिक घट्ट करण्याचा संदेश त्यांनी प्रभावीपणे दिला.
या कार्यक्रमाला मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, डॉ. सुनील चोरडिया, संजय पाटील, प्रभूदास पाटील, सीताराम कोळी तसेच कलमाडीचे सरपंच सोनू झालसे यांच्यासह परिसरातील कलमाडी, वावडे, तरवाडे, मुडी, हेंकळवाडी, तामसवाडी, मोहाडी, जवखेडा, कंचनपूर आदी गावांतील पालक व पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 150500

22 Ct सोने 91.60% : ₹. 138500

18 Ct सोने 75.00% : ₹. 114400

शुद्ध चांदी 999%:₹. 2410/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed