अमळनेरमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धेची घोषणा; महात्मा फुले व डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर सखोल अभ्यासाची संधी..

0
New-Doc-04-09-2026-07.06.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमळनेर येथे भव्य निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन व कार्य’ किंवा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य’ यापैकी एक विषय निवडणे आवश्यक आहे. निबंध स्पर्धेसाठी ८०० ते १००० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली असून निबंध सादर करण्याची अंतिम तारीख १० एप्रिल २०२६ आहे.


वक्तृत्व स्पर्धा १२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक स्पर्धकाला ८ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही आणि ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. प्रथम पारितोषिक ₹१०००, द्वितीय ₹७५० आणि तृतीय ₹५०० असे बक्षीस वितरण होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी प्रा. अशोक पवार (९४२२२७८२५६), हृदयनाथ मोरे (९४२१५१२०८५), प्रा. राहुल निकम (९८२३२२२६५९) आणि बापूराव ठाकरे (९९६०२०९८२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव वाढण्यास तसेच महान विचारवंतांच्या कार्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139200

18 Ct सोने 75.00% : ₹. 115500

शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed