इराणमधील भारतीयांसाठी तातडीचा इशारा: दूतावासाने देश सोडण्याचे आवाहन..
24 प्राईम न्यूज 9 April 2026

तेहरान – इराणमधील ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तेहरान येथील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा सल्ला (Advisory) जारी केला आहे. ७ एप्रिलच्या सल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा सर्व भारतीयांनी शक्य तितक्या लवकर इराण सोडावे, असे स्पष्टपणे आवाहन करण्यात आले आहे.

दूतावासाने सांगितले आहे की, इराणमध्ये अद्याप राहिलेल्या भारतीयांनी दूतावासाशी समन्वय साधूनच बाहेर पडावे आणि दूतावासाने सुचवलेल्या मार्गांचाच वापर करावा. कोणत्याही परिस्थितीत थेट आंतरराष्ट्रीय भूसीमेवर जाण्याचा प्रयत्न करू नये, असेही स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी भारतीय दूतावासाने खालील संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत:
+989128109115
+989128109102
+989128109109
+989932179359
ईमेल: cons.tehran@mea.gov.in
इराणमधील परिस्थिती लक्षात घेता, भारतीय नागरिकांनी सतर्क राहून दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152000
22 Ct सोने 91.60% : ₹. 139200
18 Ct सोने 75.00% : ₹. 115500
शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
