भीती आणि अंधश्रद्धेच्या आडून लैंगिक शोषण; अशोक खरात प्रकरणात धक्कादायक उघड… तेजस्वी सातपुते..

0
New-Doc-04-08-2026-06.57.jpg


24 प्राईम न्यूज 8 एप्रिल 2026
नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणात गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर आल्या असून, आरोपीने दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पीडित महिला व साक्षीदारांच्या जबाबांनुसार, खरातने भीती आणि बदनामीची धमकी देत महिलांना जाळ्यात ओढले.


एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अकादमी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपी अशोक खरात हा खडे, चिंचुके, रुद्राक्ष आणि विविध पूजाविधींचा आधार घेत लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवत होता. तो स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवत महिलांकडून पैसे उकळत असे.


तसेच, बदनामीची धमकी देत आरोपी महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ईशान्येश्वर मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत हातचलाखीने चमत्कार दाखवून लोकांची दिशाभूल करण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे.
तपासादरम्यान ३० हून अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून, पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्यासाठी मोठी कारवाई करण्यात आली आहे. सायबर टीमने सुमारे ४६५० लिंक हटवल्या असून, ४५१ सोशल मीडिया अकाउंट्स कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत.
या प्रकरणात नाशिक आणि अहिल्यानगर येथे एकूण ११ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ८ लैंगिक शोषणाचे आणि ३ आर्थिक फसवणुकीचे आहेत. काही प्रकरणांचा तपास एसआयटीकडून सुरू असून, उर्वरित तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सातपूर आणि कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले असून, आतापर्यंत सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून, दुसऱ्या गुन्ह्यातही अटक करण्यात आली आहे. न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला हजर करण्यात येत असून, पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेच्या आडून होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 148500

22 Ct सोने 91.60% : ₹. 136600

18 Ct सोने 75.00% : ₹. 112900

शुद्ध चांदी 999%:₹. 2380/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed