उन्हाळ्यात एसटी प्रवास महागणार; १५ एप्रिलपासून भाडेवाढ लागू..
24 प्राईम न्यूज 8 एप्रिल 2026
राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला ठराविक कालावधीत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार, १५ एप्रिल ते १५ जून या उन्हाळी गर्दीच्या हंगामात साध्या बससेवेच्या प्रवासभाड्यात वाढ करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे साध्या बसेसच्या तिकिटांमध्ये प्रति टप्पा सुमारे १२ रुपयांची वाढ होणार असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर होणार आहे.

दरम्यान, यात्रा, सणासुदीचा काळ, सुट्ट्या, सप्ताहअखेर तसेच अधिक गर्दीच्या कालावधीत राज्य परिवहन प्राधिकरणाने तब्बल ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी उन्हाळी हंगामासाठी ही वाढ लागू करण्यास मान्यता दिली आहे.
उन्हाळ्यातील वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असला, तरी यामुळे सामान्य नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 148500
22 Ct सोने 91.60% : ₹. 136600
18 Ct सोने 75.00% : ₹. 112900
शुद्ध चांदी 999%:₹. 2380/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
