पळासदडे गावाची कन्या तनूजा पाटीलचा G-PAT परीक्षेत यश….
आबिद शेख/ अमळनेर
पळासदडे येथील कुमारी तनूजा अरुण पाटील हिने Graduate Pharmacy Aptitude Test (G-PAT) 2026 या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने या परीक्षेत 232 गुण मिळवत ऑल इंडिया रँक 1128 प्राप्त केली आहे.

तनूजा ही पळासदडे गावचे माजी सरपंच श्री. अरुण भगवान पाटील*यांची कन्या असून तिच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गावातील नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तनूजाच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळणार असून पळासदडे गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे.
तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 148500
22 Ct सोने 91.60% : ₹. 136600
18 Ct सोने 75.00% : ₹. 112900
शुद्ध चांदी 999%:₹. 2380/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
