राज्य संघटनेची सभा पुण्यात उत्साहात संपन्न..
24 प्राईम न्यूज 7 एप्रिल
पुणे : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची सर्वसाधारण सभा तसेच राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथील शिक्षक भवनात राज्याध्यक्ष मधुकर जंगम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
नेहमीप्रमाणे सर्व सदस्यांच्या सोयीच्या दृष्टीने शिक्षक भवन येथेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून अनेक ठराव मंजूर करण्यात आले.

यामध्ये सेवानिवृत्तांचे अधिवेशन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अधिवेशनासाठी प्रमुख पाहुण्यांची निवड करण्याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री यांनी जिल्हा परिषदांना संघटनेच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा ठरावही पारित करण्यात आला. याशिवाय राज्याध्यक्ष मधुकर जंगम यांनी निधी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद घेत त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

लक्ष्मण दावणकर यांच्या उत्कृष्ट स्मरणिका कामकाजाबद्दल गौरव करण्यात आला. सेवानिवृत्त पुरस्कार, राज्य कार्यकारिणीची रचना, स्मरणिका समितीचे कामकाज, हायकोर्ट प्रकरणांचा आढावा, गटविमा योजना तसेच मनपा व नगरपालिकांच्या विविध समस्यांवरही खेळीमेळीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस राज्य सरचिटणीस गजानन नावकर, विजय भोगेकर (चंद्रपूर), उपाध्यक्ष लिंबराज जाधव, सहचिटणीस किशोर मेने (नाशिक), संघटक लक्ष्मण करडे (इंदापूर), विभागीय अध्यक्ष बाळासाहेब आडके (सांगली), एकनाथ कराड (बीड), सुरेश मवाळ (बुलढाणा), कैलास ठाकरे (नाशिक), तसेच विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपाध्यक्ष, सुनंदा शेवकरी, भारती उबाळे, मंगल श्रेष्ठ यां महिलांसह अनिल उत्तरवार यवतमाळ, देविदास नामेवार, गुलाम दस्तगीर खान जळगांव, शेख अशपाक ठाणे, उपस्थित होते
सभेच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले आणि बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 149000
22 Ct सोने 91.60% : ₹. 137100
18 Ct सोने 75.00% : ₹. 113300
शुद्ध चांदी 999%:₹. 2390/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
