अमळनेरमध्ये व्यावसायिक गॅस टंचाई; केटर्स व हॉटेल व्यावसायिकांची प्रांताधिकाऱ्यांकडे धाव..

0
New-Doc-04-06-2026-21.18.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहर व तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने केटर्स व हॉटेल व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर अमळनेरमधील केटर्स व हॉटेल व्यावसायिकांनी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देत तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून अनेक केटरर्सनी मोठ्या प्रमाणात जेवणाचे ऑर्डर स्वीकारले आहेत. मात्र गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने स्वयंपाक करणे अत्यंत कठीण झाले आहे. गॅसअभावी व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली असून याचा थेट परिणाम व्यावसायिकांच्या उपजीविकेवर होत आहे.


प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन व्यावसायिक गॅस सिलेंडरचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अमळनेर टेन्ट अँड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बडगुजर, अमळनेर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मनीष जोशी यांच्यासह घनश्याम अग्रवाल, कैलास पाटील, राजूभाऊ शेटे, मनोज दीक्षित, कन्हैया सासनानी, बी.बी. जैन, विजय पाटील, गिरीश सराफ, चंदू परदेशी, मयूर चौधरी, अरुण नेरकर, अभिमान पाटील, शाम राणे, दिलीप यावले, अनिल चौधरी, सतू महाराज, विनोद पाटील, सुशील जैन, राजेंद्र मोरे आदी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 149000

22 Ct सोने 91.60% : ₹. 137100

18 Ct सोने 75.00% : ₹. 113300

शुद्ध चांदी 999%:₹. 2390/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed