अमळनेरमध्ये ऑर्थोपेडीक तज्ज्ञांचे विशेष आरोग्य शिबिर; नागरिकांनी लाभ घ्यावा.
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी असून, हाडांचे व सांधेदुखीचे आजार असलेल्या रुग्णांसाठी विशेष ऑर्थोपेडीक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवारी दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात अनुभवी ऑर्थोपेडीक तज्ज्ञ डॉ. निखिल संजय बडगुजर (M.B.B.S., D. Ortho, मुंबई) हे रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरात उपलब्ध सुविधा पुढीलप्रमाणे असतील – एक्स-रे, फ्रॅक्चर उपचार, गुडघेदुखी व पाठदुखी उपचार, स्पोर्ट्स मेडिसिन, फिजिओथेरपी व रिहॅबिलीटेशन, हाडांचे कर्करोग निदान व उपचार, संधिवात उपचार तसेच लहान मुलांच्या अस्थिविकारांवर विशेष उपचार.

या शिबिरासाठी तपासणी फी फक्त १०० रुपये ठेवण्यात आली असून (मूळ फी ३०० रुपये), नागरिकांना कमी दरात तज्ज्ञ उपचाराची संधी उपलब्ध होणार आहे.
हे शिबिर डॉ. हेमंत कदम यांच्या तुळजाई हॉस्पिटल, क्रांती नगर, आर.के. नगरजवळ, धुळे हायवे, अमळनेर येथे होणार आहे. नोंदणीसाठी (०२५८७) २२३१३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच डॉ. बडगुजर हे धुळे येथील श्री साईबाबा हॉस्पिटल अॅण्ड अॅक्सिडेंट केअर सेंटर येथेही सेवा देत आहेत.
शहरातील हाडे, सांधे व पाठदुखीच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
