अमळनेर अग्निशमन दलाचे धाडसी कार्य : डॉग रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी..

0
New-Doc-04-03-2026-00.18.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील रेल्वे कॉलनी भागात अडकलेल्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी अमळनेर अग्निशमन दलाने तत्परता दाखवत यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले. या घटनेमुळे नागरिकांकडून अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एक कुत्रा खोल खड्ड्यात/नाल्यात अडकला होता. स्थानिक नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत दक्षतेने आणि कौशल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवून कुत्र्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.


या मोहिमेत अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख आणि आकाश संदानशिव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या समन्वय आणि धाडसामुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले.
सदर घटनेमुळे प्राणीमात्रांप्रती संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षता दाखवणाऱ्या अग्निशमन दलाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed