शतकपूर्ती वर्षात दि अमळनेर को-ऑप अर्बन बँकेची ऐतिहासिक भरारी पहिल्यांदाच ११५ कोटींचा व्यवसाय; आर्थिक सक्षमता व सक्षम व्यवस्थापनाची नोंद..

0
New-Doc-04-02-2026-09.57.jpg


अमळनेर /आबिद शेख
दि अमळनेर को-ऑप अर्बन बँकेने आपल्या शतक महोत्सवी वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. बँकेने प्रथमच तब्बल ११५ कोटी रुपयांचा व्यवसाय नोंदवत आर्थिक क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले आहे. या यशामुळे बँकेची आर्थिक सक्षमता आणि सक्षम व्यवस्थापन अधोरेखित झाले आहे.


१५ एप्रिल १९२६ रोजी स्थापन झालेल्या या बँकेला यंदा १५ एप्रिल रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वीच या बँकेची स्थापना झाल्याने तिच्या ऐतिहासिक परंपरेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
शतकपूर्ती वर्षात बँकेने विविध आर्थिक निर्देशांकांमध्ये लक्षणीय सुधारणा साधली आहे. ढोबळ एनपीए ६.७५ टक्के तर निव्वळ एनपीए १.९० टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्यात यश आले आहे. थकबाकीचे प्रमाणही केवळ ६.१२ टक्क्यांवर राखण्यात आले आहे.


आकडेवारीनुसार, बँकेचे भागभांडवल ३७०.३० लाख रुपये, रिझर्व्ह ८४४.७८ लाख रुपये, एकूण ठेवी ६७३०.६८ लाख रुपये, गुंतवणूक २६९३.६४ लाख रुपये, तर कर्जवाटप ४७५७.५८ लाख रुपये इतके झाले आहे. एनपीए रक्कम ३२१.११ लाख रुपये असून निव्वळ एनपीए ८६.११ लाख रुपये आहे. बँकेचा ढोबळ नफा ७१.३५ लाख रुपये असून सर्व तरतुदी वजा केल्यानंतर निव्वळ नफा ५५ लाख ५५ हजार रुपये इतका झाला आहे.
ग्राहकाभिमुख सेवांवर भर देत बँकेने सीटीएस क्लिअरिंग, मोबाईल बँकिंग, आरटीजीएस आणि एनईएफटी या सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, आगामी तीन महिन्यांत युपीआय व आयएमपीएससारख्या आधुनिक डिजिटल सुविधा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या यशस्वी वाटचालीत बँकेचे अध्यक्ष भरतकुमार सुरेश ललवाणी, उपाध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग महाजन, तसेच संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
शतकपूर्ती वर्षात नोंदवलेली ही उल्लेखनीय कामगिरी भविष्यातील प्रगतीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed