पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम: व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महाग, घरगुती दर मात्र स्थिर..

0
New-Doc-04-02-2026-06.53.jpg


24 प्राईम न्यूज 2 एप्रिल 2026
पश्चिम आशियामध्ये वाढत चाललेल्या तणावाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे.


१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १९५.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये या सिलिंडरची किंमत २,०७८.५० रुपयांवर पोहोचली आहे.
मात्र, सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारी बाब म्हणजे घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅसचे दर सध्या स्थिर ठेवण्यात आले आहेत.


दरम्यान, यापूर्वीही १ मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ११४.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरांवर दबाव वाढत असून त्याचा थेट परिणाम देशांतर्गत गॅस दरांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed