गांधली येथील पेट्रोल पंपावरून डंपर चोरीअज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीची घटना; माहिती देण्याचे आवाहन…
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर: तालुक्यातील गांधली येथील पेट्रोल पंपावरून ३० मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास डंपर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश संजय पाटील (रा. हिंगोणे) यांच्या मालकीचे डंपर (एमएच ४८ एजी ८३०७) हे गांधली येथील पेट्रोल पंपावर उभे करण्यात आले होते. ३० मार्च रोजी मध्यरात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधत हे डंपर पंपावरूनच चोरून नेले.

घटनेची माहिती समोर येताच वाहनमालकाने शोधमोहीम सुरू केली असून या डंपरबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास ९७३०३०१००९ किंवा ९७३०७५७५७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
