चित्रकला, रंगभरण व ‘मी आई जिजाऊ’ वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांसह महिलांचा सहभाग..
आबिद शेख/ अमळनेर
28 मार्च रोजी शाळेत चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. नर्सरी ते पहिलीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा तर दुसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी जलरंग, क्रेयॉन्स व स्वतःच्या कल्पकतेच्या जोरावर आकर्षक व सुंदर चित्रे साकारत आपली कला सादर केली. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे विशेष कौतुक केले.

स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी सायकल, द्वितीय क्रमांकासाठी एज्युकेशनल लॅपटॉप आणि तृतीय क्रमांकासाठी एज्युकेशनल किट अशी बक्षिसे देण्यात आली. पहिल्या गटात दुर्वा पवार हिने प्रथम क्रमांक, मयंक सपकाळे याने द्वितीय क्रमांक तर संकेत पंजाबी याने तृतीय क्रमांक पटकावला. दुसऱ्या गटात हिमांशू पाटील प्रथम, सुयोग पाटील द्वितीय आणि रिदीक्षा पाटील तृतीय ठरले.
याशिवाय दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉद्वारे पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना विशेष हवाई सफरीचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, 29 मार्च रोजी ‘मी आई जिजाऊ’ वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 25 महिला स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धकांनी आई जिजाऊंचे प्रेरणादायी व प्रभावी रूप सादर करत उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख अतिथींनी महिलांनी परंपरा जपत समाजात सक्रिय भूमिका बजावावी, असे प्रतिपादन केले. तसेच जयश्री पाटील व तिलोत्तमा पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत वैशाली सपकाळे यांनी प्रथम, प्रगती कंखरे यांनी द्वितीय तर मेघना पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे सोन्याची नथ, चांदीचा छल्ला व पैठणी अशी बक्षिसे देण्यात आली. पारस गोल्ड यांच्या तर्फे बक्षिसांचे प्रायोजकत्व करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे कर्मचारी, महिला समिती व पालक यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच शाळेचे नवीन शैक्षणिक सत्र 5 जून 2026 पासून सुरू होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
