ईस्माईल दगू फाऊंडेशनतर्फे हज यात्रेकरूंचा सत्कार..

नंदुरबार (प्रतिनिधी) – येथील ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे पवित्र हज व उमरा यात्रेसाठी मक्का-मदिना येथे रवाना होणाऱ्या हज यात्रेकरूंचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी नंदुरबार येथून एकूण दहा हज यात्रेकरू मक्का-मदिनासाठी रवाना झाले.
कार्यक्रमात सर्व यात्रेकरूंना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या पवित्र यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार करण्यात आलेल्या यात्रेकरूंमध्ये सैय्यद मकसुद, रऊफ शाह, गुलाम दस्तगीर, सैय्यद साहील, सलीम शेख, सैय्यद शकीला, फरजाना शाह, मुमताज बानो, नसीम शेख आणि परवीन बानो यांचा समावेश आहे.
यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी सांगितले की, इस्लाम धर्माचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांनी मानवता, दया, प्रेम आणि शांततेचा संदेश दिला आहे. मक्का-मदिना ही पवित्र स्थळे असून भाविक तेथे जाऊन धार्मिक विधी, उपासना आणि प्रार्थना करतात. हज उमराचा हा पवित्र प्रवास सर्व यात्रेकरूंना सुखरूप पार पडावा तसेच नंदुरबार जिल्ह्यात शांती व भाईचारा कायम राहावा, यासाठी प्रार्थना करण्यात यावी, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमाला निशाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप सोनवणे, सामाजिक न्याय व हक्क परिषदेचे अध्यक्ष अरुण रामराजे, पत्रकार राजेंद्रकुमार बुवा, शकील खतिब, ओबीसी ऑर्गनायझेशनचे शहर उपाध्यक्ष अजिम बागवान, तैय्यबा शेख, आप्पा वाघ, युसुफ शेख, कामिल शेख, सादीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
