अमळनेर युवासेनेची नूतन कार्यकारणी जाहीर; राहुल कंजर तालुका प्रमुख..

0
New-Doc-03-30-2026-08.57.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे युवासेनेची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. ही कार्यकारणी शिवसेना आणि युवासेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.


संसदरत्न श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव किरण साळी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांनी ही नूतन कार्यकारणी जाहीर केली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीत तालुका प्रमुखपदी राहुल भास्कर कंजर, विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी पंकज संतोष शेटे, शहर प्रमुखपदी प्रविण पुरुषोत्तम पाटील, उपशहरप्रमुख म्हणून करण सुपडू चव्हाण, शेख अल्ताप राजा फारुख आणि तुषार महेंद्र सोनार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच शहर संघटक म्हणून राकेश रविंद्र लांडगे, उपशहर संघटक म्हणून यश मोहन साळुंखे, कॉलेज कक्ष प्रमुख शंतनु शामकांत भावसार, कॉलेज कक्ष सचिव गौरव रविंद्र पाटील आणि सोशल मीडिया प्रमुखपदी खेमचंद सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


दरम्यान, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, आ. किशोर आप्पा पाटील, आ. अमोल दादा पाटील, आ. चंद्रकांत अण्णा सोनवणे, आ. चंद्रकांत भाऊ पाटील, माजी खासदार उन्मेश पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव भाऊ पाटील, महिला आघाडी विभागीय प्रमुख सरिता ताई माळी तसेच नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
नव्या कार्यकारणीमुळे युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी मोठी संधी निर्माण होणार असून ग्रामीण व शहरी भागात युवासेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील यांनी व्यक्त केला. या नियुक्तीचे सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed