साने गुरुजी स्मारक परिसरात भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील साने गुरुजी स्मारक परिसरात आज (रविवार) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान च्या जागेवर काही समाज कंटक टाॅयलेट जाळायला गेले आणि… आणि आग झाडांमध्ये पसरली व

जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले होते. त्यामुळे परिसरातील अनेक झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीमुळे काही काळ स्मारक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. त्यांच्या तत्पर आणि धाडसी कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या कारवाईत अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे, सत्येन संदानशिव, वसीम पठाण, आनंदा आणि मच्छिन्द्र चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नागरिकांकडूनही अग्निशमन दलाच्या या तत्पर कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
