मित्राच्या घरातील गोळीबारात तरुणाचा मृत्यू; आरोपी मित्राला पहाटे अटक.

0
New-Doc-03-28-2026-11.27.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील अमलेश्वर नगर परिसरात घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मित्राच्या घरात झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पहाटेच अटक केली आहे.


मृत अरुण सुरेश महाजन हा शनिवारी रात्री सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पत्नीला दवाखान्यात सोडल्यानंतर मित्र भूषण देविदास महाजन यांच्या घरी गेला होता. काही वेळानंतर “अरुणला चक्कर येऊन तो पडला आहे” असा फोन कुटुंबीयांना करण्यात आला. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर परिसरातील नागरिकांनी अरुणचा मृत्यू गोळीबारामुळे झाल्याचे सांगितले.


यानंतर मृताचा भाऊ नरेंद्र महाजन यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी भूषण महाजन याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास करून महत्त्वाचे नमुने जप्त केले आहेत.
दरम्यान, गोळीबारासाठी वापरण्यात आलेले देशी बनावटीचे शस्त्र (कट्टा) कुठून आणले आणि शहरात बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा कुठून होतो याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.
या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपासातून या गोळीबारामागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed