ढेकू रस्त्यावर भीषण अपघात; निमझरी येथील ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू…
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन निमझरी येथील ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २२ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ढेकू रस्त्यावर माऊली पॉलिटेक्निकजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, निमझरी येथील शांताराम दशरथ भिल (वय ३५) हे आपल्या एमएच १९ आर ७७४९ क्रमांकाच्या मोटरसायकलवरून जात असताना समोरून येणारी एमएच १९ डीएच ११४३ क्रमांकाची मोटरसायकल चालक विशाल सुखदेव भामरे (रा. जवखेडा) हा रॉंग साईडने भरधाव वेगात येऊन त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शांताराम भिल यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताचा भाऊ विनोद दशरथ भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.

