पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरे करण्यात आले.

या कार्यक्रमाला अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंखे, प्रा. पंकज पाटील, मान्यवर, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यप्रकारांना आणि ऐतिहासिक नाटकांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. इतिहासावर आधारित नाटकांमधून विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि शौर्याचा प्रभावी संदेश दिला.

लहान विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य आणि गाणी हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला. या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला तसेच शाळेतील शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची झलकही पाहायला मिळाली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना ठेंग, शिक्षक सोनाली पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सीमा पाटील तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

