पोदार लर्न स्कूलतर्फे भव्य रंगभरण, चित्रकला व महिलांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन..

0
New-Doc-03-24-2026-10.13.jpg


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर येथील नोबल पोदार लर्न स्कूल तर्फे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच महिलांमध्ये सांस्कृतिक जाणीव जागृत करण्याच्या उद्देशाने भव्य रंगभरण, चित्रकला आणि महिलांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा पोदार कॅम्पस, गलवाडे रोड, स्वादिष्ट नमकीन जवळ येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व चित्रकला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत दोन गट ठेवण्यात आले आहेत. गट क्रमांक १ मध्ये नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा, तर गट क्रमांक २ मध्ये दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना 29 मार्च रोजी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून पहिले बक्षीस सायकल, दुसरे बक्षीस एज्युकेशनल लॅपटॉप आणि तिसरे बक्षीस एज्युकेशनल किट असेल. याशिवाय सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉद्वारे ५ विजेत्यांना विमान प्रवासाची संधी देखील दिली जाणार आहे.


स्पर्धेसाठी प्रवेश फी २० रुपये ठेवण्यात आली असून नावनोंदणी आवश्यक आहे. स्पर्धेसाठी लागणारे चित्रकला साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतःसोबत आणायचे असून चित्रकलेसाठी लागणारा कागद आयोजकांकडून देण्यात येणार आहे.
दरम्यान, रविवार दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महिलांसाठी “मी आई जिजाऊ” या विषयावर भव्य वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून पहिले बक्षीस सोन्याची नथ, दुसरे बक्षीस चांदीचा छल्ला आणि तिसरे बक्षीस पैठणी असे आहे.
या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व “माहेरची साडी” फेम अलकाताई कुबल यांच्या शुभहस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी पोदार कॉम्पस, स्वादिष्ट नमकीन जवळ, गलवाडे रोड, अमळनेर (४२५४०१) येथे संपर्क साधावा किंवा ९१७५६७५६५१ / ८६६८४१२७२३ या क्रमांकावर नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed