नन्हे रोजेदारांचा आदर्श! अमळनेरमधील 8 व 9 वर्षांच्या मुलांनी पूर्ण केले 30 रोजे
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : पवित्र रमजान महिन्यात लहान मुलांनी दाखवलेली श्रद्धा व संयम सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. अमळनेर येथील वली अहमद (वय 9 वर्ष) व जकी अहमद तौसीफ खान (वय 8 वर्ष) या दोन नन्ह्या रोजेदारांनी यंदाच्या रमजानमध्ये संपूर्ण 30 रोजे पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

इतक्या लहान वयात पूर्ण रमजानचे रोजे ठेवणे हे मोठ्या लोकांसाठीही प्रेरणादायी ठरत असून दोन्ही मुलांचे नातेवाईक व समाजातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. संयम, श्रद्धा आणि धार्मिक भावना यांचे सुंदर उदाहरण या मुलांनी घालून दिले आहे.
वली अहमद आणि जकी अहमद हे एटीएन मोबाईल चे संचालक एहतेशाम खान यांचा मुलगा व पुतण्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला असून समाजातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

