नैसर्गिक शेतीकडे वळा, भूमीचे रक्षण करा – अमळनेरातील कार्यक्रमात शिवराज सिंह चव्हाण यांचे आवाहन..
आबिद शेख/अमळनेर. भूमी माता ही संपूर्ण सृष्टीसाठी जीवनदायिनी आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर देशव्यापी भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ श्री मंगळग्रह मंदिर येथून होत असल्याचा आनंद व्यक्त करत या अभियानात समाजातील सर्व घटकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी केले.

अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि. १९ मार्च) रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथे राष्ट्रीय स्तरावरील या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प.पू. स्वामी नृसिंह विजयेंद्र सरस्वतीजी, पद्मश्री डॉ. सुभाष शर्मा, सुनीलजी घनवट, मनोजभाई सोलंकी, डॉ. गजानन डांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.
कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री Raksha Khadse, पालकमंत्री Gulabrao Patil, मंत्री Girish Mahajan, खासदार Smita Wagh, आमदार Anil Patil यांची प्रमुख उपस्थिती होती.
नैसर्गिक शेती ही काळाची गरज
या वेळी बोलताना Shivraj Singh Chouhan म्हणाले की,
आज रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिवापर होत असल्यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान अर्ध्या एकरात तरी नैसर्गिक शेतीचा प्रयोग करावा. देशातील लाखो शेतकरी आता नैसर्गिक शेतीकडे वळले असून त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.
ते पुढे म्हणाले की,
भूमी सुपोषण हे केवळ शेतीचे नव्हे तर समाजाच्या आरोग्याचे अभियान आहे. भूमीला आई मानून तिचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमात पद्मश्री डॉ. सुभाष शर्मा, सुनीलजी घनवट, मनोजभाई सोलंकी, डॉ. गजानन डांगे, डॉ. डिगंबर महाले यांच्यासह विविध सामाजिक व कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांनी कृषी अवजारांच्या प्रदर्शनालाही भेट दिली.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम भारतभर लाईव्ह
हा कार्यक्रम देशातील कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्रे तसेच देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री Shivraj Singh Chouhan यांच्या अधिकृत सोशल मीडियावरूनही कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
विशेष आकर्षण
श्री मंगळग्रह मंदिर परिसरात नव्याने रोपवाटिका सुरू
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष
सेंद्रीय शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
राष्ट्रीय स्तरावरील अभियानाचा अमळनेरातून शुभारंभ
