नवोदय परीक्षेत अमळनेरच्या विद्यार्थ्याचे उज्ज्वल यश..

0
New-Doc-03-19-2026-22.09.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळा, अमळनेर येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी हितांश निंबा पाटील याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मध्ये ९८.७५ टक्के गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळा व शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


हितांशने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळवले आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन हेमाकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक संजीव पाटील तसेच सर्व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.
यावेळी हितांश पाटील याचे पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याने भविष्यातही असेच यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हितांशचे यश प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed