भोंदूगिरीच्या आडून अत्याचार; अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ला अटक..

0
New-Doc-03-19-2026-10.34.jpg

नाशिक/प्रतिनिधी
नाशिक : शहरातील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याला पोलिसांनी अटक केली असून बुधवारी त्याला नाशिक जिल्हा न्यायालय येथे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


या प्रकरणी संबंधित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, धार्मिक विधीच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अशोक खरातला अटक केली आहे.
दरम्यान, या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटी भविष्य जाणून घेण्यासाठी येत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यासंबंधीचे काही व्हिडीओही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पोदार स्कूल तर्फे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवेश घेणाऱ्यांना रजिस्ट्रेशन फी मध्ये 50%अशी भाव्य सूट.लिमिटेड ऑफर
त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.


सिन्नर तालुका येथे अशोक खरातने ‘श्री शिवनिका संस्थान’ नावाचे मंदिर स्थापन केले होते. या मंदिराच्या विश्वस्त मंडळात रूपाली चाकणकर यांचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिराला भेट दिल्याने अशोक खरात जास्त चर्चेत आला होता.
ऑफिसमध्येच महिलेशी अश्लील वर्तनाचा व्हिडीओ समोरआला आहे
अशोक खरातविरोधात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली त्याने स्वतःच्या ऑफिसमध्ये एका महिलेशी अश्लील चाळे केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून विधीचे नाटक करताना आणि त्यानंतर तिच्याशी गैरवर्तन करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ २०२४ मधील असल्याचे सांगितले जात असून २०२२ ते २०२४ या कालावधीत अशोक खरातने आणखी किती महिलांना फसवले आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed