लाचप्रकरणी कार्यालयीन अधीक्षकाला ३ वर्षे सक्त मजुरी; जिल्हा व सत्र न्यायालय धुळेचा निकाल..

0
New-Doc-03-19-2026-06.35-1.jpg

24 प्राईम न्यूज 19 मार्च 2026
धुळे : ग्रामपंचायत विरदेल येथील अंगणवाडी बांधकाम प्रकरणात लाच स्वीकारल्याप्रकरणी पंकज विक्रम पाटील यांना जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे यांनी ३ वर्षे सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल दि. १७ जानेवारी २०२६ रोजी देण्यात आला.


सविस्तर वृत्त असे की, विरदेल (ता. शिंदखेडा) येथील अंगणवाडीचे काम वेळेत पूर्ण न केल्याने तक्रारदारास बांधकाम उपविभागाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्या वेळी जिल्हा परिषद, धुळे च्या बांधकाम विभागात कार्यालयीन अधीक्षक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत असलेल्या पंकज पाटील यांनी तक्रारदारावरील प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली होती.

पोदार स्कूल तर्फे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवेश घेणाऱ्यांना रजिस्ट्रेशन फी मध्ये 50%अशी भाव्य सूट.लिमिटेड ऑफर
त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.


तक्रारदाराकडून दि. १६ सप्टेंबर २०१६ रोजी ही लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्फत पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या खटल्याची सुनावणी एस. एम. तापकीर यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपी पंकज विक्रम पाटील यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दोषी ठरवत कलम ७ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, तसेच कलम १३(१)(ड) सह १३(२) अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
या खटल्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता देवेंद्र तवर व सरकारी अभियोक्ता अजय सानप यांनी न्यायालयात बाजू मांडली.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास त्वरित तक्रार नोंदवावी. यासाठी १०६४ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed