जळगावच्या रेल्वे प्रश्नांवर संसदेत जोरदार आवाज; दुसऱ्याच दिवशी मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा. – खासदार स्मिताताई वाघ.
आबिद शेख/अमळनेर
– जळगाव लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांसाठी खासदार स्मिताताई उदय वाघ यांनी संसदेत प्रभावी मांडणी करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत सहभागी होत त्यांनी जळगाव जिल्ह्याशी संबंधित विविध प्रश्न ठामपणे मांडले.

भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेत झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. २०१४ नंतर रेल्वे अधिक आधुनिक, सुरक्षित आणि गतिमान झाल्याचे सांगत महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. १००% विद्युतीकरण, नवीन रेल्वे मार्गांची उभारणी आणि ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत स्थानकांचा विकास ही महत्त्वाची कामगिरी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.
जळगावसाठी अत्यंत महत्त्वाचा उधना-जलगाव रेल्वे कॉरिडॉर सुमारे ८० टक्के पूर्णत्वाकडे असून जुलै २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या प्रकल्पामुळे मुंबई-भुसावळ-जलगाव मार्गावरील ताण कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच या मार्गावर ‘कवच’ सुरक्षा प्रणाली लागू होत असल्यामुळे रेल्वे सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे.
यावेळी त्यांनी सूरत-भुसावळ एक्सप्रेस (१९००५) आणि देवलाली-भुसावळ एक्सप्रेस (११११३) या गाड्यांच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना होत असलेल्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसत असल्याचे सांगत या गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच उधना-पुणे दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कृषीप्रधान जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने रेल्वे लॉजिस्टिक्सचे महत्त्व स्पष्ट करत केळी, कापूस यांसारख्या उत्पादनांसाठी कोल्ड स्टोरेज, पार्सल व वेअरहाऊस सुविधा उभारण्याची गरजही त्यांनी मांडली.
दुसऱ्याच दिवशी मंत्र्यांची भेट; सकारात्मक प्रतिसाद
संसदेतील चर्चेनंतर १७ मार्च रोजी खासदार वाघ यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत उधना-पुणे एक्सप्रेस सुरू करण्यासह उधना-भुसावळ आणि देवलाली-भुसावळ पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यासोबतच पाचोरा येथे विदर्भ एक्सप्रेस व चाळीसगाव येथे कर्नाटक एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणीही करण्यात आली. जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर व धरणगाव परिसरातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती देण्यात आली.
रेल्वेमंत्र्यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच याबाबत निर्णय होईल, असे संकेत दिल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
