ब्रह्माकुमारिज तर्फे विषमुक्त नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार..

0
New-Doc-03-17-2026-01.05.jpg


नांदेड (दि. १६ मार्च २०२६) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड तसेच प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांच्या वतीने जिल्हा कृषी व धान्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध धान्य व शेती उत्पादने यांचे स्टॉल लावून आपली उत्पादने सादर केली.
या धान्य महोत्सवामध्ये सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बि.के. भगवानभाई इंगोले यांनी सेंद्रिय हळद व विविध प्रक्रिया युक्त उत्पादने सादर केली, तर विश्वनाथ होळगे यांनी नैसर्गिक विषमुक्त शेतीतील भाजीपाला प्रदर्शित केला. तसेच सत्यनारायण मंत्री यांनी नैसर्गिक पद्धतीने उत्पादित गावरान हळदीचे प्रदर्शन केले.
या स्टॉलना भेट देऊन प्रजापिता ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्कचे प्रतिनिधी बि.के. राजेंद्रभाई शंकरपुरे यांनी शेतकऱ्यांचा ईश्वरीय सत्कार केला. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आध्यात्मिक समाधान व्यक्त करत विषमुक्त नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले.
हा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्कच्या संचालिका राजयोगिनी अनिता दिदिजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमामुळे नैसर्गिक व विषमुक्त शेतीबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed