शॉर्ट सर्किटमुळे पिंपळे येथे गव्हाच्या शेतीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, अग्निशमन दल उशिरा पोहोचले.

0
New-Doc-03-15-2026-23.37.jpg


आबिद शेख/अमळनेर
पिंपळे गाव परिसरात शॉर्ट सर्किटमुळे गव्हाच्या उभ्या पिकाला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली. ही आग भीमराव नारायण पाटील यांच्या शेतातील गव्हाच्या पिकाला लागली असून काही वेळातच मोठे क्षेत्र जळून खाक झाले.


आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ पालिकेच्या अग्निशमन विभागाला फोन करून कळवले. मात्र अग्निशमन दलाकडून आधी पोलिसांत तक्रार करण्यास सांगण्यात आल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. “तक्रार करतो तोपर्यंत आग थांबणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

पोदार स्कूल तर्फे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवेश घेणाऱ्यांना रजिस्ट्रेशन फी मध्ये 50%अशी भाव्य सूट.लिमिटेड ऑफर
त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.


दरम्यान, आग वेगाने पसरत असल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश मिळाले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र आग पूर्णपणे विझल्यानंतरच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.
या घटनेत भीमराव नारायण पाटील यांच्या गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed