मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 127 रुग्णांची तपासणी, 71 जण शस्त्रक्रियेसाठी पात्र…
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाउंडेशन

(धनवाडी) आणि आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 15 मार्च रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा एकूण 127 रुग्णांनी लाभ घेतला, तर त्यापैकी 71 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.
पात्र रुग्णांना मंगळवार,

त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.
दि. 17 मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथून विशेष वाहनाद्वारे आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या शिबिरात अमळनेर, धुळे, चोपडा, जळगाव, एरंडोल तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरात डॉ. राहुल चौधरी, भुपेंद्र वाघ, विजय संमेसे, हर्षदा शिंदे, प्राची गायकवाड, योगेश कोळी आणि सागर पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, तसेच रजनीकांत पाटील, गणेश शिंदे, प्रमोद पाटील, नितेश बारी आदींनी सहकार्य केले.
दरम्यान, दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी श्री मंगळग्रह मंदिर येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे नियमित आयोजन केले जाते, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
