अमळनेर श्रीराम नवमी उत्सव समितीचे नवे नेतृत्व जाहीर; अध्यक्षपदी विजय महाजन, उपाध्यक्षपदी मनोज ठाकरे..
अमळनेर : आबिद शेख
अमळनेर येथील श्रीराम नवमी उत्सव समिती २०२६ च्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी विजय महाजन (रॉयल शेतकरी) तर उपाध्यक्षपदी मनोज भाऊ ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली. आगामी श्रीराम नवमी उत्सव अधिक उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी या दोन्ही तरुण व कार्यक्षम पदाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.
विजय महाजन आणि मनोज ठाकरे हे दोघेही अमळनेर शहरातील धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. नियुक्ती जाहीर होताच श्रीराम भक्तांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवनियुक्त अध्यक्ष विजय महाजन व उपाध्यक्ष मनोज ठाकरे यांनी निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. यंदाचा श्रीराम नवमी उत्सव भव्य आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व रामभक्तांना सोबत घेऊन उत्तम नियोजन केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
