धुळे रोडवर रेती डंपरचा धुमाकूळ; अपघातात तरुणाचा मृत्यू, नागरिकांचा प्रशासनावर संताप..

0
20260314_065826-BlendCollage.jpg


अमळनेर : आबिद शेख
शहरातील अत्यंत वर्दळीचा मानला जाणारा धुळे रोड सध्या रेती वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे धोकादायक बनला असून आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, धुळे रोडवर रेती वाहतूक करणाऱ्या डंपरची संख्या गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज अंदाजे ४०० ते ५०० डंपर या मार्गाने शहरातून जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सतत जड वाहनांची वर्दळ सुरू असून अपघाताचा धोका वाढत चालला आहे.
धुळे रोड परिसरात शाळा, दुकाने तसेच मोठ्या प्रमाणावर रहिवासी वस्ती आहे.

तरीही या मार्गावरून अवजड डंपरची बेफाम वाहतूक सुरू असल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. अनेक डंपर चालक नियम धाब्यावर बसवून अतिवेगाने वाहन चालवत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे.
दरम्यान, आज झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावरून इतक्या मोठ्या प्रमाणात डंपर वाहतूक सुरू असताना वाहतूक विभाग, पोलीस आणि महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या घटनेनंतर नागरिकांकडून शहरातून होणाऱ्या रेती डंपर वाहतुकीवर तात्काळ निर्बंध घालावेत, नियमांचे कठोर पालन करावे आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed